सुकळी विद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विविध स्पर्धा संपन्न…
मुक्ताईनगर — तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका कृषी अधिकारी,मुक्ताईनगर अभिनव माळी व मंडळ कृषी अधिकारी, कुऱ्हा नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन माध्यमिक विद्यालय सुकळी येथे रांगोळी , निबंध व चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.याप्रसंगी तंत्र सहाय्यक कु.टी.वाय.परतेती व प्रा. श्रीमती व्ही. ए. सोनवणे मॅडम यांनी रांगोळी स्पर्धाचे मूल्यांकन केले.तसेच कृषी सहाय्यक एन.एम.बहिरम व मुख्याध्यापक पी.पी.दाणे यांनी चित्रकला स्पर्धेचे मूल्यांकन केले. कृषी पर्यवेक्षक ए.पी. पाटील यांनी तृणधान्य बद्दल माहिती दिली.कृषी सहाय्यक एस. इ . उदळकर यांनी ज्वारी ,बाजरी ,नाचणीपासून कोणकोणते पदार्थ बनवता येईल याबद्दल माहिती. कृषी सहाय्यक वाय.बी.ठाकरे यांनी तृणधान्याची लागवड पद्धत याबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमास उपशिक्षक डी.एम.फेगडे, एस.एम.बोदडे, एस.बी.चौधरी, आर.जी.वाघ , व्ही.आर.काकडे , एम.डी.दांडगे , संदीप पावरा ,मयूर सपकाळे, लिपिक नवलकोळी , शिपाई अनिल चौधरी, विजया सोनोने व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.