पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने ५२ हजार पोस्टपत्राची भव्य मिरवणुक…
प्रतिनिधी/अमळनेर: येथील पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने आज विक्रमी ५२ हजार पोस्टपत्र भव्य मिरवणुकीने मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसाचे निमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे अमळनेर पोस्ट मास्तर रघुनाथ साळुंखे यांना सुपूर्द करण्यात आले.’धरणाचे आंदोलन आता जनतेच्या हातात देऊ व परिणामास शासन जबाबदार राहील!’ असा जाहिर इशारा समितीच्या वक्त्यांनी दिला.
रणरणत्या उन्हामध्ये बळीराजा स्मारकयेथे जमलेल्या हजारो आंदोलकांनी बळीराजाला पुष्पहार अर्पण करून क्रांतीची मशाल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पेटविण्यात आली.जनतेने लिहिलेले हजारो पत्र ठेवून सजलेल्या बैलगाडी पुढे काढून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. बैलगाडीपुढे जनआंदोलन समितीचे शेकडो कार्यकर्ते पांढरी गांधी टोपी घालून ‘पाडळसे धरण झालेच पाहिजे ‘ घोषणा देत होते. त्यापुढे मोठ्या संख्येने रॉयल उर्दू स्कूलचे, अँड ललिता पाटील इंग्लिश स्कूल,पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूल,विद्यार्थी पिवळ्या टोप्या घालून चालत होते तर सर्वात पुढे सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी लेझिम खेळत मिरवणुकीला लक्षवेधी शोभा आणली होती.महिला कार्यकर्त्या मोठ्या जोशात घोषणा देत होत्या तर सर्वात पुढे तिरंगा ध्वज घेवून माझी सैनिक संघटनेचे फौजी जिपगाडीवर जय जवान,जय किसानचा नारा देत होते. विविध राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते,विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी ‘धरण झालेच पाहिजे’ या मागणीच्या टोप्या घालून घोषणाबाजी करत विश्राम गृह,विजय मारोती,बस स्टँड,पाचपावली देवी,लालबाग शॉपिंग मार्गे,अग्रसेन महाराज चौकात आले.पोस्ट ऑफिस समोरील मैदानात यावेळी झालेल्या सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ५२५०० पोस्ट कार्डचे गठ्ठे स्टेजवर पोस्ट मास्तर रघुनाथ साळुंखे यांना सुपूर्द केले.यावेळी पोस्ट मास्तर साळुंखे यांनी ५२ हजार ५०० पोस्टपत्र मिळाल्याचे सांगत तातडीने स्टॅम्पिंग करून मंत्रालयात पाठवण्यात येतील असे जाहीर केले.यावेळी समितीचे प्रमुख कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी १९९७ पासून धरणाचे कासवगतीने चालणाऱ्या कामास, वाढणाऱ्या हजारो कोटींच्या किंमतीस राज्यकर्त्यांचा नाकर्ते पणा कारणीभूत ठरला असल्याचा घणाघाती आरोप केला.शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या समितीच्या सहनशीलतेचा अंत: पाहू नका!असा इशाराही दिला. महेंद्र बोरसे यांनी पुनर्वसनाबाबतचे प्रश्न मांडत शासन कायद्यांच्या आड विस्थापितांना न्याय देण्यात दिरंगाई करते असे सांगितले. धुळे चे मा.आ.प्रा.शरद पाटील यांनी हजारो पत्रांची नोंद शासनाने न घेतल्यास आता समितीने आक्रमकपणे रस्त्यावर उतरावे असे आवाहन केले.तर माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी हा एकमेव माणूस सातत्याने धरणासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह लढत असल्याने जनतेनेही आता निष्क्रिय नेत्यांना जागा दाखवावी असे जाहीर आवाहन केले.पाडळसे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी तालुक्यातील जनतेची सर्वपक्षीय मंत्री व नेत्यांनी निम्न तापी प्रक्लपाबाबत खोटी आश्वासन देवून
फसवणूक केल्याची जाहीर टिका करत आजी माजी लोकप्रतिनिधींच्या घोषणांचा समाचार घेतला.हजारो पत्रांमधील मागणीनुसार धरनाबाबतच्या सर्व सुधारित प्रशासकीय मान्यता देवून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत निर्णय न झाल्यास पत्रात लिहिल्यानुसार येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल असे जाहिर केले.सभेचे सूत्रसंचलन पत्रकार संजय पाटील यांनी केले.आभार महेश पाटील,सुनिल पाटील यांनी मानले.आर बी पाटील यांनी मिरवणुकीत डफावर गीते सादर केली.
मंचावर समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,चंद्रकांत काटे,समितीचे हेमंत भांडारकर, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, महेश पाटील, सुनिल पाटील, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, रामराव पवार, गोकुळ पाटील, महेंद्र बोरसे,आर बी पाटील, अजयसिंग पाटील, गोकुळ बागुल, प्रवीण संदानशिव, प्रताप साळी, सुपडू बैसाणे, अँड तिलोत्तमा पाटील, प्रतिभा पाटील, राजश्री पाटील, पुरुषोत्तम शेटे, बापू चौधरी, रियाज मौलाना, रजाक शेख, नारायण बडगुजर,सुरेश पाटील, एस आर पाटील,
डी के पाटील, सुशील भोईटे आदीं प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रांच्या भव्य मिरवणुकीत डॉ अनिल शिंदे, नगरसेवक मनोज पाटील, शेतकरी नेते सुभाष पाटील, आधार फाऊंडेशन चे अशोक पाटील,अरुण देशमुख, मनोहरनाना पाटील, धनगर पाटील, आम आदमी चे शिवाजी पाटील,प्रा गणेश पवार, भाजपचे श्याम अहिरे,महेंद्र महाजन, रमेश धनगर, राष्ट्रवादीचे अनिल शिसोदे,भूषण भदाणे,सुनिल शिंपी, मंगळ ग्रह मंदिर अध्यक्ष दिगंबर महाले, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी,शिवसेनेचे कल्याण पाटील, सूरज परदेशी, बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रथमेश पवार,कुंदन खैरणार, बोहरी समाजाचे मकसुद बोहरी, प्रितपालसिंग बगा,रोटरी चे कीर्ती कोठारी,पांडुरंग महाजन,नावेद शेख, टपरी धारक संघटनेचे चंद्रकांत साळी,फौजी धनराज पाटील आदिंसह मोठ्यसंखेने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
मंचावर समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,चंद्रकांत काटे,समितीचे हेमंत भांडारकर, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, महेश पाटील, सुनिल पाटील, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, रामराव पवार, गोकुळ पाटील, महेंद्र बोरसे,आर बी पाटील, अजयसिंग पाटील, गोकुळ बागुल, प्रवीण संदानशिव, प्रताप साळी, सुपडू बैसाणे, अँड तिलोत्तमा पाटील, प्रतिभा पाटील, राजश्री पाटील, पुरुषोत्तम शेटे, बापू चौधरी, रियाज मौलाना, रजाक शेख, नारायण बडगुजर,सुरेश पाटील, एस आर पाटील,
डी के पाटील, सुशील भोईटे आदीं प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रांच्या भव्य मिरवणुकीत डॉ अनिल शिंदे, नगरसेवक मनोज पाटील, शेतकरी नेते सुभाष पाटील, आधार फाऊंडेशन चे अशोक पाटील,अरुण देशमुख, मनोहरनाना पाटील, धनगर पाटील, आम आदमी चे शिवाजी पाटील,प्रा गणेश पवार, भाजपचे श्याम अहिरे,महेंद्र महाजन, रमेश धनगर, राष्ट्रवादीचे अनिल शिसोदे,भूषण भदाणे,सुनिल शिंपी, मंगळ ग्रह मंदिर अध्यक्ष दिगंबर महाले, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी,शिवसेनेचे कल्याण पाटील, सूरज परदेशी, बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रथमेश पवार,कुंदन खैरणार, बोहरी समाजाचे मकसुद बोहरी, प्रितपालसिंग बगा,रोटरी चे कीर्ती कोठारी,पांडुरंग महाजन,नावेद शेख, टपरी धारक संघटनेचे चंद्रकांत साळी,फौजी धनराज पाटील आदिंसह मोठ्यसंखेने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.मंचावर समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,चंद्रकांत काटे,समितीचे हेमंत भांडारकर, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, महेश पाटील, सुनिल पाटील, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, रामराव पवार, गोकुळ पाटील, महेंद्र बोरसे,आर बी पाटील, अजयसिंग पाटील, गोकुळ बागुल, प्रवीण संदानशिव, प्रताप साळी, सुपडू बैसाणे, अँड तिलोत्तमा पाटील, प्रतिभा पाटील, राजश्री पाटील, पुरुषोत्तम शेटे, बापू चौधरी, रियाज मौलाना, रजाक शेख, नारायण बडगुजर,सुरेश पाटील, एस आर पाटील,
डी के पाटील, सुशील भोईटे आदीं प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रांच्या भव्य मिरवणुकीत काँग्रसचे डॉ अनिल शिंदे, नगरसेवक मनोज पाटील, शेतकरी नेते सुभाष पाटील, आधार फाऊंडेशन चे अशोक पाटील,अरुण देशमुख, मनोहरनाना पाटील, धनगर पाटील, आम आदमी चे शिवाजी पाटील,प्रा गणेश पवार, भाजपचे श्याम अहिरे,महेंद्र महाजन, रमेश धनगर, राष्ट्रवादीचे अनिल शिसोदे,भूषण भदाणे,सुनिल शिंपी, मंगळ ग्रह मंदिर अध्यक्ष दिगंबर महाले, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी,शिवसेनेचे कल्याण पाटील, सूरज परदेशी, बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रथमेश पवार,कुंदन खैरणार, बोहरी समाजाचे मकसुद बोहरी, प्रितपालसिंग बगा,रोटरी चे कीर्ती कोठारी,पांडुरंग महाजन,नावेद शेख, टपरी धारक संघटनेचे चंद्रकांत साळी,फौजी धनराज पाटील आदिंसह मोठ्यसंखेने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.