नववधुचं स्वागत पाहण्यासाठी गर्दी …

IMG-20230210-WA0002.jpg

प्रतिनिधी अमळनेर : हौसेला मोल नसते असे म्हटले जाते आणि तसाच प्रकार अमळनेरात घडला बिल्डर
सरजू गोकलाणी यांनी आपल्या लाडक्या सुनेला चक्क हेलिकॉप्टर वर आणले आणि जंगी स्वागत केले. हे पाहून सून देखील भारावली होती.
सर्वसाधारणपणे लग्न समारंभात वर पक्षाची सरबराई केली जाते. त्यांच्या परिवाराचा मानपान केला जातो. मात्र मुलगा मुलगी समान मानून अद्यपही एकत्र कुटुंबात नांदणाऱ्या गोकलानी परिवाराचे प्रमुख बिल्डर सरजू गोकलाणी यांनी आपल्या सुनेला खऱ्या अर्थाने घरची लक्ष्मी मानून तिला अहमदनगर येथून हेलिकॉप्टर मधून आणले.
गोकलानी यांचा मुलगा आशिष याचा विवाह नगर येथील आईस्क्रीम चे उद्योगपती चंदानी परिवाराची सिमरन हिच्याशी होत आहे.
सरजू गोकलाणी यांनी खास पुण्याहून नगर आणि नगरहून वधू ला घेऊन अमळनेरला हेलिकॉप्टर आणले. अमळनेर आल्यावर वर आशिष त्यात बसला आणि पुन्हा हेलीकॉप्टर ने टेकअप घेऊन मंगळ मंदिरावर फुलांचा वर्षाव करून परत प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर उतरले. नववधुच्या स्वागतासाठी संपूर्ण गोकलानी परिवारासह नातेवाईक प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर जमला होता. त्यांनतर १३ वाहनाच्या ताफ्यासह गोकलानी परिवाराने वधूला घरी नेले. नववधुची गाडी स्वतः सासरे सरजू गोकलानी यांनी चालवली. पुढे आणि मागे काळ्या गाड्या होत्या मध्ये पांढऱ्या गाड्या होत्या.

हवाई सफारी करून कसे वाटले या प्रश्नवर नववधूने आनंद व्यक्त करत हे माझे सासरे नाहीत पण वडीलच आहेत. हेलिकॉप्टर च्या खाली उतरताच फुलांचा वर्षाव ,संगीत नृत्य करत वधूवराचे स्वागत करण्यात आले. नववधुचं स्वागत पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकाच गर्दी केली होती. पोलिसांना विशेष बंदोबस्त ठेवावा लागला होता. सुमारे चार ते पाच लाख रुपये फक्त नववधूच्या स्वागतासाठी खर्च करण्यात आले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!