सुहागरातच्या रात्री कॅमेरा चालू ठेवून कपलनं केलं असं काम, Video सोशल मीडियावर होऊ लागला Trend
मुंबई -आजकाल प्रत्येकालाच सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचं आहे. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतं, प्रसिद्ध होणासाठी काही तरुण मंडळी तर आपल्या जीवाशी देखील खेळतात.
ते काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी इतक्या थराला पोहोचतात की ते आपल्या चांगल्या वाईट कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका कपलचा आहे. त्यांनी आपल्या सुहागरात म्हणजेच लग्नाच्या पहिल्याच रात्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आजकालची तरुण पिढी प्रसिद्ध होण्यासाठी आपल्या प्रायवेट क्षणांना देखील सर्वांसमोर मांडू लागले आहेत. त्यांना असं वाटत असावं की हा ट्रेंड असावा किंवा मग आम्ही खूप पुढारलेल्या विचारांचे आहोत, पण असं असलं तरी या अशा क्षणांचे व्हिडीओ शेअर करणे हे कितपत योग्य हे त्यांचं त्यांनाच ठावूक हा व्हिडीओमध्ये नववधू आण नवरदेव एका खोलीत आहेत, लग्न झाल्यानंतर नववधू आपला मेकअप आणि दागिने काढत आहे आणि नववधूला हे सगळं करत असताना नवरदेव मदत करत आहे. त्या दोघांनी त्यांचे हे खास क्षण कॅमेरात कैद करुन स्वत: सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या व्हिडीओच्या शेवटी त्या दोघांनीही एकमेकांना किस्स केलं. व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा arushirahulofficial या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी देखील जोरदार कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे, तर काहींना त्यांना ट्रोल देखील केलं आहे.