श्रीक्षेत्र सुकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रम.

images-7.jpeg

प्रतिनिधी / राजधर महाजन – एरंडोल तालुक्यातील श्रीक्षेत्र सुकेश्वर येथे प्राचीन शिव मंदिरात महाशिवरात्री यात्रा उत्सव निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत १८ फेब्रुवारी शनिवारी सकाळी शिव अभिषेक व विविध देवता पूजन ११ते १२ फकीरा महाजन (रिंगणगाव ) व नामदेव महाजन सरपंच रवंजे यांच्याकडून फराळ दुपारी दोन ते चार ह भ प शिवाजी महाराज पष्टाने कर यांचे संकीर्तन पाच ते सहा हरिपाठ संध्याकाळी प्रेमराज माळी खर्च कर यांच्याकडून फराळ रात्री नऊ ते अकरा ह भ प सखाराम महाराज कजगावकर यांचे संकीर्तन.
रविवारी सकाळी नऊ ते अकरा हभप विजय भामरे यांचे काल्याचे संकीर्तन अकरा ते एक प्रकाश रोकडे यांच्याकडून महाप्रसाद या कार्यक्रमास ह भ प योगेश महाराज ह भ प धनंजय महाराज हे सहभागी होणार आहेत. तरी भाविकांनी या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विजय भामरे व सचिव समाधान कोळी यांनी केले आहे ‌

About Author

You may have missed

error: Content is protected !!