महाशिवराञोत्सवानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रम..!
एरंडोल: येथे आठवडे बाजार परीसरात अंजनी नदीच्या काठावर महादेवाचे जुने मंदीर आहे. पांडव वनवासात असतांना ते या महादेवाची पूजा-अर्चा करीत असल्याची दंतकथा आहे. या पविञ ठिकाणी महाशिवराञी ला दरवर्षी रयाञोत्सव भरवला जातो. या पार्श्वभुमीवर या वर्षी देखिल १८,१९ व २० या तीन दिवशी किर्तने,कैलासपतीची महापूजा,महादेव प्रतीमेची मिरवणूक,कुस्त्यांचे सामने अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष हे की, या महादेवाची अभिषेक-पूजा ही विद्यमान पोलिस अधिकार्याच्या हस्तेच करण्याच्या परंपरेनुसार १८फेब्रुवारी शनिवार रोजी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते सपत्निक अभिषेक पूजा होणार आहे.
शनिवारी ह.भ.प.अशोक महाराज(शिरपूर), रविवारी ह.भ.प लक्ष्मण महाराज (आळंदी) व सोमवारी ह.भ.प. युवराज महाराज(दोंडाईचा) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
२०फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी कुस्त्यांचे सामने होणार असून आखाडा पूजन खासदार उन्मेश पाटील व आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तरी कुस्तिशौकिन व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव मंदीर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेशसिंग परदेशी,उपाध्यक्ष अँड.नितिन महाजन,सचिव वसंत चौधरी,विश्वस्त अशोक चौधरी,दिनेश पाटील,संजय महाजन यांनी केले आहे.