जंगल सफारीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल .

n472436368167662611427005488ed0ec559d5ea7535b6c66ce43de4e4dbaf15f082ef49e5bd70727ee0020.jpg

Viral Video सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जंगल सफारीच्या एका व्हिडीओमुळं खळबळ उडाली आहे. बिबट्या,वाघ, सिंहासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीत मुक्त संचार करून माणसांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

रस्त्यावरून प्रवास करताना किंवा जंगलात भटकत असताना वन्य प्राणी माणसांवर जीवघेणा हल्ला करतात. तसेच राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास हे प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. जंगल सफारीचा अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. जंगल सफारी करताना सफारी वेहिकलवर तीन वाघांनी झडप घेतली. वाघांनी सफारी वेहिकलवर झेप घेताच पर्यटकांचा थरकाप उडाला. वाघांचा व्हायरल झालेला व्हिडीओ पेंच नॅशनल पार्क येथील असल्याचं समजते.

https://www.instagram.com/reel/CmbJqxfK994/?utm_source=ig_web_copy_link

वाघांचा धक्कादायक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. एका सफारी वेहिकलमध्ये बसून काही पर्यटक जंगल सफारी करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण पर्यटकांचे सफारी वेहिकल वाघांच्या गुहेजवळ जाताच तीन वाघांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वाघ वेहिकलवर झेप घेऊन खिडक्यांमधून आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सफारी वेहिकलवर वाघांनी झेप घेतल्यानंतर पर्यटकांना धक्का बसला. वाघ गाडीच्या जवळ आल्यावर पर्यटकांनी कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा केला नाही. पर्यटक वाघांनी पाहून थक्क झाले आणि वेहिकलमध्ये शांत बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!