एरंडोल येथील उमेश महाजन व प्रल्हाद महाजन यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार
एरंडोल प्रतिनिधी – येथील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पीतांबर महाजन व जय बाबाजी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष उमेश अभिमान महाजन हे सातत्याने आरोग्य क्षेत्रात रुग्णांना योग्य ती मदत करत असतात तसेच समाजात विविध प्रकाराचे स्तुत्य उपक्रम करत असतात म्हणून याची दखल घेऊन जळगाव येथील राजनंदिनी बहुुद्देशिय संस्थेच्या वतीने दोघांना डॉ. केतकी पाटील व मेजर सुरेश पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
या वेळी संस्थेचे सह संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ, गोदावरी फाऊंडेशन च्या सदस्या डॉ केतकी पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते यानंतर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती संदीपा वाघ यांनी पुढील वाटचालीसाठी प्रल्हाद महाजन व उमेश महाजन यांना शुभेच्छा दिल्या.
उमेश महाजन यांनी आता पर्यंत कॅन्सरग्रस्त,किडनी च्या आजार असलेले रुग्णांचे ऑपरेशन शासनाच्या योजनांच्या माध्यमातून मोफत घडवून आणले आहेत.
तसेच वयाच्या 29 व्या वर्षीच समाजभूषण पुरस्कार मिळवणारे उमेश महाजन हे एरंडोल मध्ये पहिलेच युवा आहेत त्यांच्या मुळे समाजात एक आनंदाचे वातावरण आहे. पुढील वाटचाली साठी महाजन यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहे.