अंगावरील स्त्री धनाच्या मागणीसाठी खर्ची बुद्रुक येथील विवाहितेचा छळ
एरंडोल;-तालुक्यातील खर्ची बुद्रुक येथील विवाहिते च्या अंगावरील स्त्री धनाची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या मंडळीकडून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला तिने एरंडोल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पती ज्ञानेश्वर साहेबराव माळी, सासू मुक्ताबाई साहेबराव माळी, सासरे साहेबराव दशरथ माळी, दिर शरद साहेबराव माळी, दिराणी दिपाली शरद माळी, ननंद शोभा मनोहर माळी राहणार अडावद तालुका चोपडा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे
ज्ञानेश्वर व वैशाली यांचा विवाह १४ एप्रिल २००८ रोजी झाला होता त्यांना १३ वर्ष वयाचा एक व ११ वर्ष वयाचा दुसरा अशी दोन मुले आहेत. तिला सासरच्या लोकांनी मारहाण व शिवीगाळ करून क्रूर वागणूक देण्यात आली असा ठफका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.
पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे करीत आहेत.