माहिती अधिकार कार्यकर्ता संघातर्फे भूमिअभिलेख कार्यालयाच्या विविध तक्रारींबाबत निवेदन.

IMG-20230224-WA0020.jpg

प्रतिनिधी – एरंडोल येथील एरंडोल तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता संघातर्फे उपाधीक्षक भूमी अभिलेख एरंडोल यांना भूमी अभिलेख कार्यालयाच्या विविध तक्रारींबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात जिल्हाधिकारी जळगाव यांचेतर्फे तालुका भूमिअभिलेख कार्यालयाला कलम १५५ नुसार उतारा दुरुस्ती करण्यासाठी आदेश दिले होते तरी सुद्धा भूमिअभिलेख कार्यालयाने उतारा दुरुस्ती साठी वेळ लागत असल्याचे कारण काम करीत नाहीत तसेच ऑन लाईन ची कामे तत्काळ करण्यात यावी तसेच जी कामे ऑन लाईन झालेली नसतील ती ऑफ लाईन करून मिळावी तसेच मालमत्ता पत्रकावरील फेरफार नोंदी,हक्क सोड,खरेदी विक्री झालेल्या नोंदी हि कामे वर्षानुवर्षे होत नाहीत ती वेळेवर व्हावीत,कुठलाही कर्मचारी मुख्यालयात राहत नाही व उद्धटपणे वागणूक दिली जाते तसेच पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत तरी याबाबत चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी व एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयात कायमस्वरूपी उपाधीक्षकाची नियुक्ती व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर तालुकाध्यक्ष बबन पाटील,नितीन ठक्कर,राजधर महाजन,भुषण चौधरी,सिताराम मराठे,गजानन महाजन,पंडित पवार,मधुकर मराठे,गणेश माळी,स्वप्निल देवरे,श्रीकृष्णा शिंपी, मनोज बिर्ला आदींच्या सह्या आहेत

About Author

You may have missed

error: Content is protected !!