” विद्यार्थ्यांनो मराठी भाषेचा सार्थ अभिमान धरा” मराठी राजभाषा दिनानिमित्त संस्थाध्यक्ष श्री सचिनजी विसपुते यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…
एरंडोल – गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल या ठिकाणी मराठी राजभाषा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष भाऊसो श्री.सचिनजी विसपुते हे होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवयित्री सन्माननीय सौ. मंगला रोकडे तसेच माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण या होत्या. मराठी राजभाषा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात “मी मराठी” या गीतावर नृत्य सादर करण्यात आले तसेच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे सादरीकरण केले, मराठी भाषेचे महत्व आपल्या भाषणांमधून विशद केले. कवयित्री सौ. मंगला रोकडे यांनी मराठी दिवस का साजरा केला जातो त्यामागचे कारण तसेच वि. वा
शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तक, नाटक तसेच कवितांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कवयित्री सौ मंगला रोकडे यांनी लिहिलेल्या दहा कवितासंग्रहातील पर्यावरण, स्त्रीभ्रूण हत्या, मराठी आमची मायबोली, स्त्रीशिक्षण, पाऊस अशा विविध विषयांना हात घालत काव्यवाचन केले. संस्थाध्यक्ष भाऊसो श्री. सचिन विसपुते यांनी कितीही शिकलात तरी मातृभाषेला विसरू नका, मातृभाषेचा सार्थ अभिमान धरा, अभ्यासातील विविध संकल्पना या मातृभाषेतूनच स्पष्ट होतात असे सांगितले. तसेच मराठी मध्ये असणाऱ्या विविध कादंबऱ्या, नाटक व कविता यांचे वाचन केल्याने आपली भाषा समृद्ध होते असे प्रतिपादन केले. यावेळी गोपी गोल्ड च्या मुख्याध्यापिका सौ. रुपाली जाधव उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आशा पाटील मॅडम तर आभार कविता सुर्वे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..