धक्कादायक! सर्व्हिस सेंटरच्या समोर शेतकऱ्याने पेटवून दिली रिक्षा …

n47570636416775190769212aeea2b7b058dd4402d8ada7a0077b8bacddd228b6ce4f7e549f8b5fd8b22da4.jpg

प्रतिनिधी – औरंगाबाद शहरातील धक्कादायक घटना समोर आलेली असून, इलेक्ट्रॉनिक वाहन दुरुस्ती करण्यासाठी सर्व्हिस सेंटरकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने स्वतःची रिक्षा पेटवून दिली .ना दुरुस्त रिक्षा दुरुस्त न करता फक्त पैसे उकळण्यात आल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांने केला आहे. शहरातील प्रोझोन मॉलच्या बाजूला असलेल्या महेंद्रा कंपनीचं रत्नप्रभा मोटर्स सर्वेस सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. तर प्रसाद पाटील असे रिक्षा पेटवून देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्रसाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पेशाने डॉक्टर असून, सोबत शेती व्यवसाय हि करतात. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे त्यांनी दोन वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक रिक्षा घेतली होती. मात्र नवीन रिक्षा असून, देखील त्यामध्ये वारंवार काम निघत होते. तर मागे एकदा काम निघाल्यावर सर्व्हिस सेंटरवर दोन महिने गाडी उभी राहत होती.त्यामुळे याचा फटका त्यांच्या दुध व्यवसायावर देखील होत होता. अनेकदा सर्व्हिस सेंटरवर पार्ट उपलब्ध राहत नसल्याचे सर्व्हिस सेंटरकडून सांगण्यात येत होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पाटील यांची पुन्हा गाडी खराब झाली. सर्व्हिस सेंटरवर गाडी लावून देखील वेळेवर परत मिळत नव्हती. जेव्हा गाडीमालक पाटील यांनी थोडी आक्रमक भूमिका घेत विचारणा केली तर गाडी दुरुस्त करून दिली. पण गाडी घरी आणल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी बंद पडली. त्यामुळे पुन्हा सर्व्हिस सेंटरवर गाडी लावली. पण तरीही गाडी दुरुस्ती होत नसल्यामुळे गाडी मालकाने आपली गाडी सर्व्हिस सेंटरवरच गाडी पेटवून दिली.

About Author

You may have missed

error: Content is protected !!