कासोदा येथे अल्पसंख्यांक सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी सोसायटी चे उद्घाटन
कासोदा ता ,एरंडोल( प्रतिनिधी)
कासोदा येथील अल्पसंख्याक सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी सोसायटी भारत सरकार च्या निधी योजने अंतर्गत युनिटी आर्थिक विकास निधी लिमिटेड कासोदा ह्या नावाने सुरू करण्यात आली आहे कार्यालयाचे उद्घाटन च्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी समाजसेवक नंदलाल मोहिते होते , उद्घाटक जळगाव येथील प्रसिद्ध व्यापारी रोटरी क्लब चे सदस्य रेडक्रॉस सोसायटी चे सदस्य व मेमन फाऊंडेशन चे अध्यक्ष अब्दुल गानि भाई मेमन तर प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव येथील हाजी जाकीर कुरेशी, इम्रान अली सय्यद, राजाभाऊ मंत्री सहकारी पतपेढीचे मॅनेजर व माजी सरपंच संजय भाऊ नवाल, डॉ. नुरूद्दिन मुल्लाजी, नॅशनल हायस्कुल एरंडोल चे मुख्याध्यापक फारूक सर, भैय्या भाऊ राक्षे, सैय्यद अफसर अली, समद कुरेशी, जमील सर, होते ह्या निमित्ताने सोसायटी तर्फे विशेष योगदान बदल स्मृती देऊन सन्मानित करण्यात आले डॉ. नुरूद्दिन मल्लाजी यांना अवॉर्ड मिळाल्याने सत्कार करण्यात आले सोसायटी अंतर्गत अल्पसंख्याक सरकारी कर्मचाऱ्यांना बिगर व्याजी फक्त दोन टक्के प्रोसेस फी आकारून कर्ज योजना अमलात येणार आहे प्रमुख पाहुण्यांचे सहकार संदर्भात भाषणे झाली प्रास्ताविक सोसायटी चे चेअरमन मुश्ताक शेख यांनी केले
गनी मेमन यांनी आपल्या भाषणात जीवन कसे जगावे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तर कोरोनामुळे आपले आपले फार नुकसान झाले पण भारतीय संस्कृतीची उदाहरणे समोर आली यावेळी कोणीही एक दुसऱ्याची समाज पाहिली नाही एक दुसऱ्यांना सहकार्य केले भेदभाव विसरून गेले जणू काय परमेश्वराने आपल्यासाठी एक उदाहरण पेश केली व आपल्याला बंधुभाव जगण्याच्या मार्ग दाखवला
डॉ ,नुरुद्दीन मुल्लाजी यांनी विन व्याजाने कर्ज उपलब्ध करणे हे एक समाजसेवा आहे असे सांगून कार्यकारणीची प्रशंसा केली सूत्रसंचालन साबीर आफाक यांनी केले आभार सोसायटी चे सचिव असलम अली यांनी मानले सोसायटी कार्यकारिणी मुश्ताक अहेमद,असलम अली,अब्दुल अज़ीज़,मोहंमद ज़ाकीर ,ऐनोद्दीन शेख,मोहंमद रीयाज़,मोहंमद ईक्बाल,शेख मो. फरीद,शेख साबीर,सैय्यद नदीम,शेख रशिद व सभासद हजर होते.