संदिप देशपांडे यांच्या वरील हल्याचा मनसे तर्फे निवेदनाद्वारे निषेध.

IMG-20230304-WA0023.jpg

प्रतिनिधी – एरंडोल तालुका
मनसेतर्फे तहसीलदार सुचिता चव्हाण यांना मनसे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व मुख्यप्रवक्ते व मुंबई महानगरपालिका मा.नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
निवेदनात शिवाजी पार्क येथे मनसे मुख्य प्रवक्ते तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य संदिप देशपांडे हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने त्यांच्यावर हल्ला केला.त्यामुळे एरंडोल महाराष्ट्र नवनिर्माण सेना या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करीत असल्याचे म्हटले आहे तसेच हल्लेखोरांना पोलिसांनी तातडीने अटक करावी व कठोर शिक्षा द्यावी लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे.निवेदनावर मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार,तालुका सचिव साहेबराव महाजन,तालुका उपाध्यक्ष निंबा पाटील,उप शहराध्यक्ष जगदीश
सुतार,मधुकर सोनार, शाखाध्यक्ष विनायक देसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!