मुलाच्या हातातील मोबाईल पालकांनी हिसकावून घेतला मुलाने १७ व्या मजल्याला लटकला अन्., अंगावर शहारा आणणारा Video Viral

n47786724216781543227622020145f935aaaa2e35e69525b1b5708c51b80ffc0755f68c99b51c29af16729.jpg

सध्याच्या काळातील लहान मुलांना मोबाईलचे किती वेड आहे हे सांगण्याची गरज नाही. मुलांना सतत हातात मोबाईल हवा असतो त्यावर तासनतास ते आवडीचे कार्यक्रम पाहात असतात. शिवाय त्यांच्या हातातून पालकांनी जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला तर ते जेवतही नाहीत.

सध्या अशाच एका मुलाच्या हातातील मोबाईल पालकांनी हिसकावून घेतला म्हणून त्या मुलाने असं काही कृत्य केलं आहे. जे पाहून अनेकांच्या अंगावार काटा आला आहे. शिवाय या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ सिंगापूरमधील असल्याचं सांगितल जात आहे. या व्हिडीओत, वडिलांनी मोबाईल हिसकावून घेतला म्हणून रागवलेला मुलगा इमारतीचा १७ व्या मजल्यावरच्या खिडकीत जाऊन अतिशय धोकादायक ठिकाणी उभा राहिल्याचं दिसत आहे. शिवाय तो कुटुंबीयांना आत्महत्येची धमकीदेखील देतो, अशातच घरचे त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतानाच, अचानक हात सुटल्याने मुलगा थेट १७ व्या मजल्यावरुन खाली कोसळतो. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा उंच इमारतीच्या खिडकीत लटकताना दिसत आहे. शिवाय तो अतिशय धोकादायक ठिकाणी उभा असल्याचंही दिसत आहे. आपल्या आई-वडिलांना मोबाईल आणि आयपॅड परत न केल्यास तो उडी मारेल, अशी धमकी देतो. याचवेळी त्याचे पालक या घटनेची माहीती पोलिसांना देतात. माहिती मिळताच पोलिस तत्परतेने अग्निशमन दलासह घटनास्थळी दाखल झाले.

https://twitter.com/i/status/1631895856352722945

पोलिस इमारतीखाली मुलगा पडला तर त्याला वाचवण्यासाठी मोठी गादीसारखे प्लॅस्टीकचे कुशम पसरतात. त्याचवेळी मुलाचा हात सुटतो आणि तो खालच्या गादीवर पडतो. पण पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे मुलाचा जीव बचावतो. या धक्कादायक आणि अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचाव्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकजण तो आईक आणि शेअरही करत आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!