एरंडोल नगर पालिकेचे दिवाबत्ती विभागाच्या
दिवसाही दिवे सुरू ..

IMG_20230315_124750.jpg

एरंडोल नगरपालिके तर्फे पथदिव्यांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. नवीन पथदिवे लावणे तसेच पथदिव्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती, हायमास्ट बसविणे यासाठी हा खर्च होतो. अंधार पडण्यास सुरुवात झाली की, रस्त्यावरील दिवे सुरू होणे व पहाटे वेळेवर बंद होणे अपेक्षित असते. मात्र काही ठिकाणी दिवसभर हे दिवे सुरूच असतात. त्याउलट शहरात अनेक भागात रात्रीही रस्त्यावरील दिवे बंद असतात.
शहरातील पथदिवे सुरू आहेत का? कुठे बिघाड आहेत का? हे दिवाबत्ती विभागातील इंज‌िनीअर तसेच संबंधित दिवाबत्ती कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सर्वेक्षण करून पाहणे आवश्यक आहे. मात्र पालिकेचे कर्मचारी शहरात फिरून हे सर्वेक्षण करतात का, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
नगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रात्री आजही दिवे बंद असतात. त्या दिव्यांची दुरुस्ती होत नाही, हे उघड आहे. पालिकेच्या दिवाबत्ती विभागाचा कारभार पाहणाऱ्या इंजिनीयर यावर नियंत्रण आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गेली चार-पाच दिवसा पासून एरंडोल पालिका क्षेत्रातील जुन्या कासोदा रस्त्यावरील दिवे हे गेले तीन तीन दिवसापासून दिवस-रात्र सुरूच आहेत संबंधित नगरपालिका प्रशासक मुख्याधिकारी विकास नवाळे व इंजिनियर त्यांना तक्रार देऊनही दिवे चालूच असल्याचे आढळून आले संबंधित यंत्रणेने तांत्रिक बिघाडामुळे दिवे चालू असल्याचे सांगण्यात आले..
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पथदिवे रात्रभर सतत सुरू राहणे आवश्यक आहे मात्र पालिकेच्या दिवाबत्ती विभागाला याचा विसर पडलेला दिसतो व ते रात्रीच नाहीं तर दिवसा देखील चालू असल्याचे आढळून येत आहे एकीकडे गावात नादुरुस्त झालेले दिवे बदलले जात नाही.
तर पालिकेच्या दिवाबत्ती विभागाचे गावांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असे गावातील जानकरांनी मत व्यक्त केले आहे…..

About Author

You may have missed

error: Content is protected !!