उत्राण गुजर हद्दच्या ग्रामपंचायत सदस्याने जात पडताळणी सादर न केल्याची तक्रार.
एरंडोल:- तालुक्यातील उत्राण गुजर हद्दच्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाल्मीक विठ्ठल ठाकरे हे २०२१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले. दोन अडीच वर्ष निवडणुकीला पूर्ण होऊन देखील सदर सदस्याने जात पडताळणी अद्याप सादर केलेली नाही अशी तक्रार एकलव्य संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष जय रतन मोरे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०/१/अ अनुवे त्यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा एकलव्य संघटना पंधरा दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असा इशारा तक्रारी अर्जाद्वारे करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी शासकीय यंत्रणा कधी चौकशी करणार व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे कधी पाठवणार याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.