एक तरुण चक्क आपलं स्वत:चेच लग्न विसरला, मग नवरीनं असं काही केलं की.
नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर वधू वराचे अनेक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत . तसेच सोशल मीडियाचा जगात एखादी घटना वाऱ्यासारखी पसरते. अशा एका लग्नाची गोष्ट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे.
या विचित्र लग्नाच्या चर्चेचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल..बिहारमधील भागलपूर येथील सुलतानगंज येथून एक भलताच प्रकार पुढे आला आहे. या ठिकाणी एक तरुण चक्क आपलं स्वत:चेच लग्न विसरलाय. झालं असं की हा तरुण भरपूर दारू प्यायला असून, त्याला दारु सेवन करण्याचे प्रचंड व्यसन आहे. लग्नापूर्वीही त्याने मद्य प्राशन केले. परिणामी तो नशेत तर्रर्र असल्याने लग्नालाच उपस्थित राहू शकला नाही. विवाह ठरल्याप्रमाणे नवरीला घेऊन वधू पक्षाचे लोग विवाहस्थळी पोहचले मात्र मुहुर्त होऊन गेला तरी नवरदेवाचा पत्ता नव्हता. त्यानंतर विचारपूस केली असता नवरदेव नशेत तर्र असल्याचे कळले. नवरदेवाचा कारनामा समजताच वधू पक्षाकडील लोक प्रचंड चिडले. यानंतर नवरी भलतीच चिडली असून मुलीने लग्नास नकार दिला.
बराच वेळ लग्नाच्या मंडपात हा वाद सुरु राहिला. दरम्यान, मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तरुण आणि तरुणाच्या नातेवाईकांसह त्यांचा मित्रपरिवार या सर्वांनाच पकडून ठेवले. या सर्वांनी विवाहासाठी आतापर्यंत झालेला खर्च परत करावा आणि हे लग्न मोडावे, अशी मागणी केली. नंतर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांतही पोहोचले आहे.