कोणी तरी येणार येणार गं…! लेकीसह आई, सासू आणि आजीही गर्भवती; VIDEO सोशल मीडियावर VIRAL
लग्नाचे फोटोशूट अगदी प्रेग्नसी आणि मॅटरनिटी फोटोशूट याशिवाय लहानमुलांचे खास फोटोशूट असे अनेक प्रकार आज काल पाहिला मिळतात. सोशल मीडियावर प्री वेडिंग फोटोशूट मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात.
या फोटोशूटसाठी भन्नाट आयडिया शोधल्या जातात. मध्य तरी एक कपलचं प्री वेडिंग फोटोशूट खूप गाजलं होतं. त्यांनी चहा मळ्यात फक्त पांढऱ्या चादरीसोबत फोटो काढले होते. त्या प्रत्येक फोटोमध्ये कपल खूप रोमँटिक होताना दिसले होते. पण सध्या एक प्रेग्नन्सी फोटोशूट आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
ऐकावं ते नवलंच!
कोणी तरी येणार येणार गं…ही गोड बातमी कळली की घरात आनंदाचं वातावरण असतं. नवीन पाहुण्यासाठी घरात एकच उत्सुकता असते. या एका बातमीने घरात सगळ्यांचं प्रमोशन होतं. जी बायको असते ती आई होणार असते, नवरा बाबा, सासू-सासरे आजीआजोबा…कोणी मावशी, मामा, आत्या तर कोणी काका…आता त्या छोट्याशा तान्ह्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो.