रवंजे बुद्रुक येथे रस्त्याची कामे निकृष्ट ग्रामस्थांची चौकशीची मागणी..

IMG-20230328-WA0025.jpg

प्रतिनिधी एरंडोल– तालुक्यातील रवंजे येथे रस्त्याची कामे निकृष्ट झाल्याची तक्रार जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता कडे रवंजे बुद्रुक ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे त्यात म्हटले आहे की रवंजे बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय ते युवराज कोळी यांच्या घरापर्यंत चा रस्ता व हनुमान मंदिर ते महिला शौचालय कडे जाणारा रस्ता अशा दोन रस्त्याची कामे निविदेतील निर्देशाप्रमाणे झालेला नाही सदर कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाले लीअसून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडत असून तळे जाण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे रस्त्याचा बोजवारा उडाला आहे या कामासाठी शासनाचा सुमारे दहा लाख रुपये निधी खर्च होऊन पावसाळापूर्वी या रस्त्याची समस्या जैसे थे होणार आहे तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याचे काम करणारे ठेकेदार व देखरेख करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर कारवाई करून रस्त्याचे काम नियोजित आराखडा व अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दिले असून निवेदनावर किशोर पितांबर चौधरी सतीश गोकुळ चौधरी सुरेश आनंदा नन्नवरे ज्ञानेश्वर मोरे रामचंद्र मोरे रवींद्र चौधरी भगवान माळी प्रदीप देशमुख संजय पाटील दत्तात्रय महाले गुलाब कोळी आदी ग्रामस्थांच्या साक्षर आहेत

About Author

You may have missed

error: Content is protected !!