आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा …
अमळनेर : नैसर्गिक विधिकरिता जाणाऱ्या दोघा आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील आरोपीला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
वैजापूर येथील तीन लहान आदिवासी मुली १३ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजेदरम्यान नैसर्गिक विधिकारिता जात असताना तेथिलच देवेंद्र राजेंद्र भोई (मोरे) वय २४ याने त्यांचा रस्ता अडवून हात ओढला. एक मुलगी पळून गेली मात्र दोन मुलींना मोटरसायकलवर बसवून त्याने त्यांच्यावर अत्याचार केला. मुलींचे ओरडणे ऐकून पालक येताच देवेंद्र पळून गेला. देवेंद्र विरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी देवेंद्र ला अटक करण्यात आली होती. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ऍड राजेंद्र चौधरी यांनी १९ साक्षीदार तपासले. डॉक्टरांची साक्ष आणि डी एन ए रिपोर्ट ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्या पी आर चौधरी यांनी आरोपी देवेंद्र यास बाल लैंगिक अत्याचार पोक्सो कायदा तसेच भादवी कलम ३७६ व कलम ३७६ अ प्रमाणे नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३६३ प्रमाणे सात वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पो कॉ उदयसिंग साळुंखे , हिरालाल पाटील यांनी तर केस वॉच म्हणून कॉन्स्टेबल गणेश चौधरी , राहुल रणधीर यांनी काम पाहिले