पिंपळकोठा जवळील अपघातात एक जण ठार
औषधाने भरलेल्या टेलरला लागली आग…
प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील पिंपळकोठा बु गावा जवळील हॉटेल नॅशनल पंजाब समोर टँकर व टेलर यांच्या झालेल्या समोरांवरील अपघातात एक ठार झाला असून औषधाने भरलेला टेलर ला आग लागली.
दिनांक २८ मार्च रोजी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हॉटेल नॅशनल पंजाब जवळ धुळ्या कडून येणाऱ्या टँकर क्रमांक एम एच ३४ बीजी ९८३७ हिने जळगाव कडून धुळ्याकडे जाणाऱ्या टेलर क्रमांक एन एल ०१ क्यू ७१५१ चालकाचे टेलर वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या टँकर हीच जोरदार धडक दिल्याने ती रोडच्या डाव्या साईडला जाऊन खाली उतरली व टेलर हिचे केबिनमध्ये आग लागल्याने केबिनसह मागील बाजूने पेड घेतला .
टेलर क्रमांक एन एल झिरो एक क्यू ७१५१ वरील चालकांनी त्याच्या ताब्यातील ट्रक घाईघाईने निष्काळजीपणे रस्त्याच्या पलीकडे दुर्लक्ष करून भरघाव वेगाने चालविल्याने त्याच्या ताब्यातील टेलरचे नियंत्रण सुटल्याने त्याच्या ताब्यातील ट्रक हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाऊन समोरुन येणाऱ्या टँकर क्रमांक एम एच ३४ बीजी ९८३७ हीच जोराची धडक दिल्याने ती रोडच्या डाव्या साईडला जाऊन खाली उतरली व टँकर एम एच ३४ बीजी ९८३७ चालक नावे बिंदू मेहताब देहरिया स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाला
सकाळी साडेचार वाजता लहू अभिमन चव्हाण राहणार पिंपळकोठा बु यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे करीत आहे.