मालमत्ता कर न भरणा-या पेट्रोल पंप ,ठिबकच्या दुकानावर एरंडोल न. प. कडून कडक कारवाई..
प्रतिनिधी – एरंडोल शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी कराच्या १००% वसुलीचे उद्दिष्ट पूर्ततेकामी मुख्या्धिकारी तथा प्रशासक श्री विकास नवाळे यांनी आढावा बैठक घेऊन संपूर्ण शहरात थकबाकी वसुली करीता धडक कारवाई पथकांची नेमणूक केली असून कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला आहे.
त्यानुसार आज दि. 28/03/2023 रोजी डॉ.अजित भट , शरद राजपूत, यामिनी जटे ,अशोक मोरे रघुनाथ महाजन, किशोर महाजन,लक्ष्मण पाटील, दिपक गोसावी, आशिष परदेशी, वैभव पाटील, राजेंद्र घुगे ,विनोद जोशी, दिपक पाटील,सलीम पिंजारी यांच्या पथकाने एरंडोल शहरातील जळगांव रोड वरील प्रकाश भाटिया व नितीन छाजेड यांच्या मालकीचा पेट्रोल पंप , ललिता मधुकर जाधव यांची ठिबक कंपनी, ज्ञानदीप व्यायाम शाळा, सावदा मर्चंट बँक ,सबनुर बी अब्दुल शाह , अल्ताफ खान नयुम खान पठाण, रवींद्र लुभान पाटील यांच्या मालमत्तांना टाळे /सील लावण्यात आले. या थकीत कर दात्यांना कराची रक्कम भरण्याकरता वारंवार सूचना देऊन तसेच विनंती करून देखील भरणा न केल्यामुळे मालमत्ता जप्तीची/टाळे लावण्याची कटू कारवाई करण्यात आली. वसुली पथकाच्या या कारवाई अंतर्गत सुमारे 12 लाख रक्कम वसुल करण्यात आली.
याकरिता भविष्यात असा प्रसंग उद्भवू नये म्हणून सर्व कर दात्यांनी त्यांच्याकडील येणे कराची रक्कम त्वरित नप कोषागारात भरणा करून नगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विकास नवाळे यांनी केले आहे.
तरी सर्व करदात्यांनी 31 मार्च च्या आत आपल्या करांचा भरणा करावा व कटु प्रसंग टाळावा व न.पा.स सहकार्य करावे असे आवाहन एरंडोल न.पा.चे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विकास नवाळे यांनी केले आहे.