बापरे! काय सांगतात राव मासे खाण्याआधीच घडलं असं काही की…
नवी दिल्ली – आजकालचे लोक खाण्याविषयी खूप हौशी असलेले पहायला मिळतात. फूडी लोक नेहमीच बाहेर गेल्यावर काहीतरी नवीन गोष्टी ट्राय करतात. त्यामुळे सोशल मीडियावर अशा फूडी लोकांचे बरेच व्हिडीओ धुमाकूळ घालतात.खाताना घडलेले मजेशीर, विचित्र आणि धक्कादायक प्रकार कायमच समोर येत असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर रेस्टॉरंटचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्लिप फक्त 11 सेकंदांची आहे, ज्यामध्ये आपण टेबलवर एक खास डिश सर्व्ह केलेली पाहू शकतो.
ताटात दोन माशांसोबत सॅलडही दिसत आहे. सुरुवातीला सर्व काही ठीक दिसत आहे पण तो माणूस माशाच्या तोंडाजवळ चॉपस्टिक घेताच, तो अचानक जिवंत असल्याचं समजतं आणि मासा चॉपस्टिकला दातांमध्ये पकडतो. ती व्यक्ती माश्याच्या तोंडातून चॉपस्टिक खेचण्याचा प्रयत्न करते तेव्हाही मासा ते सोडत नाही.
https://twitter.com/i/status/1625013271110770688
हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की, रेस्टॉरंटवाल्यांनी जिवंत मासे खायला कसे दिले?
तर काहींचा असा विश्वास आहे की कदाचित ही डिश अशा प्रकारे दिली जात असेल. हा व्हायरल होत व्हिडीओ पाहून मात्र सर्वच थक्क झाले आहेत.