क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा १३४ वा स्मृतिदिन साजरा…..!
एरंडोल येथे महात्मा फुले यांना अभिवादन…
प्रतिनिधी -स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाज सुधारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा १३४ वा स्मृतिदिन एरंडोल येथे संपन्न झाला.
या निमित्ताने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी महात्मा फुले यांचे जीवनकार्य व सत्यशोधक समाजाचे महाराष्ट्रात सुरू असलेले उपक्रम याविषयी सखोल चर्चा करण्यात आली… पुरोगामी महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांचे विचारच सामाजिक व शैक्षणिक प्रगतीकडे नेऊ शकतात असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी केले. याप्रसंगी सत्यशोधक समाजाच्या वतीने ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सर्व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, माजी नगरसेवक प्रकाश महाजन, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद महाजन, ईच्छाराम माळी, पी जी चौधरी, अनिल महाजन, ॲड आकाश महाजन, शिवदास महाजन, सुदर्शन महाजन, सचिन महाजन, नितीन महाजन, कमलेश महाजन, समाधान महाजन, प्रल्हाद महाजन, मधुकर महाजन, दीपक महाजन, प्रवीण महाजन, धनराज महाजन, कविराज पाटील, यांच्यासह अनेक फुले प्रेमी उपस्थित होते…