एरंडोल महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
एरंडोल- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३४ वी पुण्यतिथी निमित्त अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर, कुलसचिव श्री. बोरसे भाऊसाहेब, ज्येष्ठ प्रा.ए. टी. चिमकर, डॉ. हेमंत पाटील, डॉ.सोपान साळुंखे (विद्यार्थी विकास अधिकारी), डॉ. मीना काळे, डॉ. शर्मिला गाडगे, डॉ. रेखा साळुंखे, डॉ. उमेश गवई, प्रा. सागर विसपुते, प्रा. महेंद्र शिरसाठ, प्रा.उमेश सूर्यवंशी तसेच सर्व प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.विजय गाढे यांनी केले, सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. योगेश येंडाईत, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. सविता पाटील यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.