एरंडोल महाविद्यालयात व शास्त्री इन्स्टिट्यूट येथे संविधान दिन साजरा……

InCollage_20241129_111834919


प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे दादासाहेब दि. शं. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष अमित पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, माजी प्रभारी प्राचार्य प्रा.एन.ए. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर. एस. पाटील, पर्यवेक्षक प्रा. नरेंद्र गायकवाड, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण केदार, कुलसचिव बोरसे भाऊसाहेब आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले. भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आले. याप्रसंगी डॉ. नरेंद्र तायडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. मीना काळे, डॉ. संदीप कोतकर, डॉ. अतुल पाटील, डॉ.राहुल पाटील, प्रा. महेंद्र शिरसाठ, प्रा. उमेश सूर्यवंशी, नितीन पाटील व शेखर पाटील आदी सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय गाढे यांनी केले. सूत्रसंचालन महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.सविता पाटील व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश येंडाईत यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि. 26 नोव्हेंबर, 2024 रोजी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु असल्याने, प्रत्येक प्रात्यक्षिक वर्गात स्वतंत्रपणे संविधानाच्या उद्देश्याचे वाचन प्रा. करण पावरा यांनी केले व संविधाना प्रति एकनिष्ठतेची शपथ घेण्यात आली. सदरील कार्यक्रमास संस्थेचं प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले, उप प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले

About Author

You may have missed

error: Content is protected !!