जगद्गुरु रामानंदाचार्य पुरस्कृत गणेश्वर शास्त्री द्रविड यांची श्री मंगळ ग्रह मंदिराला सदिच्छा भेट
संस्थेच्या विश्वस्थांकडून पाद्यपूजन
अमळनेर :
ज्योतिष शास्त्रात महापारंगत असलेले काशी येथील आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी मंगळवारी येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरास भेट दिली. यावेळी उपस्थित विश्वस्तांनी त्यांचे पाद्यपूजन केले.
आचार्य द्रविड हे वैदिक संप्रदायाचे राष्ट्रीय प्रसारक आहेत. त्यासाठी ते सतत भारतभ्रमण करत असतात. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी श्री मंगळ ग्रह मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते पालखी पूजन व महाआरती करण्यात आली .त्यानंतर मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, तसेच मंगल सेवेकरी विनोद कदम यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले. पाद्यपूजन फक्त आई-वडील, गुरुजन, राजा, जावई व साधुसंत यांचेच केले जाते.
कोण आहेत गणेश्वर शास्त्री द्रविड ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना सर्वाधिक चर्चा झाली ती आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड़ यांची. उमेदवारी अर्ज भरताना ते मोदींच्या शेजारी बसलेले होते. पण त्यांची ओळख फक्त मोदींचे प्रस्तावक म्हणूनच नाही. तर ते देशातील प्रसिद्घ ज्योतिष आहेत. अयोध्येतील भव्य अशा मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त त्यांनीच सुचवला होता. पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शुभ मुहूर्त सुद्धा त्यांनीच सुचवल्याचे सांगण्यात येत आहे. आचार्य द्रविड़ यांना जगद्गुरू रामानंदाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गणेश्वर शास्त्री यांचे कुटुंब काशी येथे दीर्घकाळापासून वास्तव्यास आहे. सध्या ते काशीच्या रामघाट परिसरात गंगेच्या काठावर राहतात. गणेश्वर शास्त्री हे ग्रह, नक्षत्र आणि चौघडींचे महान तज्ञ आहेत.