पुणे शहर वाहतूक विभागात संविधान दिन साजरा.
प्रतिनिधी पुणे – संविधानाचा अमृत महोत्सव पुणे शहर वाहतूक विभागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी पुणे शहरातील वाहतूक पोलिसांना संविधान आणि मी या विषयावर मार्गदर्शन केले.
आपल्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाले असून संविधान हे पुस्तक नसून एक जिवंत दस्तावेज आहे.
आपण प्रत्येकाने संविधानातील मूलभूत तत्त्वांचा अभ्यास करून संविधानाचे वाचन केले पाहिजे.
संविधान मध्ये सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार दिले असून नागरिकांचे संरक्षणही यामध्ये केले आहे.
महाराष्ट्र शासनाने घर घर संविधान हा उपक्रम राबवला असून 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सविधान बद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे.
पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी या कार्यक्रमाबद्दल विशेष आभार मानले.
यावेळी संविधान उद्देशिका याची सामूहिक वाचन करण्यात आले.
भविष्यात आम्ही सर्व कर्मचारी संविधानाच्या विचाराचे पालन करून संविधानाचा प्रचार प्रसार करू अशी सर्व वाहतूक पोलिसांनी प्रतिज्ञा केली.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील गवळी,
पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव
पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर पवार हे उपस्थित होते.