एरंडोल येथे एकाच वेळी दुचाकी व टीव्ही लंपास …..
प्रतिनिधी एरंडोल:- येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुरुवारी रात्री टीव्ही व दुचाकीची हातोहात चोरी केल्याच्या घटना वेगवेगळ्या भागात घडल्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
गांधीपुरा परिसर परिसरातील हिंगलाज कॉलनीमध्ये वंदना पाटील या घर बंद करून कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराची खिडकी तोडून मध्ये प्रवेश केला तसेच सामानाची अस्तव्यस्त फेकाफेक केली आणि टीव्ही घेऊन पोबारा केला तर हरी नगर परिसरात राहणारे महेश कांतीलाल पाटील यांची घराबाहेर लावलेली प्लेटिना दुचाकी अज्ञात चोरट्यांनी प्रसार केली.
दरम्यान घर बंद करून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी तसेच वाढत्या थंडीमुळे घर आतून बंद करून झोपणाऱ्या नागरिकांनी चोरांपासून सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे..