विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..

IMG-20241130-WA0061

प्रतिनिधी एरंडोल: प्रत्येक व्यक्ती ही जन्माला येतांनाच स्वतःचं वेगळं अस्तित्व घेऊन जन्मास आलेली असते.संबंध आयुष्यभर आपलं जीवन समाजासाठी सम्पर्पित करीत असते. त्याने/तीने आयुष्यभरात केलेल्या उत्तम कार्याची समाज नकळत दखल घेत असतो. असेच वेगळं आणि चाकोरी बाहेरील आपलं कार्य सिद्ध करणाऱ्या समाजशील व्यक्तिमत्वांचा मानव सेवा बहुउद्देशीय संस्था,एरंडोल ता.एरंडोल.जि जळगाव,महाराष्ट्र या संस्थेतर्फे राज्यस्तरीय गुणगौरव व विविध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विविध क्षेत्रातील गुणवंतांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष विक्की खोकरे, सह सचिव, प्रा.आर.एस.पाटील, सचिव फकिरा खोकरे,उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केले आहे.

या पुरस्कारासाठी राज्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, वैद्यकीय,कृषी, कला, इ क्षेत्रात ठोस कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा संस्थेतर्फे प्रस्ताव मागवण्यात येत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक शैक्षणिक,राजकीय,सांस्कृतिक अनेक मान्यवर विचारवंत प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. सदर पुरस्कार सोहळा पुढील महिन्यात डिसेंबरला होणार आहे.

तरी कृपया सदर व्यक्तीचा प्रस्ताव खरा असावा,कोणाच्याही शिफारसीचा नसावा.
पुरस्काराचे स्वरूप खालीलप्रमाणे-मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ असे असून सर्व पुरस्कारर्थींसाठी सोहळ्याच्या दिवशी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि लांबून येणाऱ्या व्यक्तींना राहण्याची देखील सोय उपलब्ध केले आहे. कृपया आपला प्रस्ताव खालील मोबाईल क्रमांकावर लवकरात लवकर (9096175486) संपर्क साधून प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विक्की खोकरे यांनी केले आहे

About Author

You may have missed

error: Content is protected !!