images.jpeg

जळगाव : पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव द्वारा दिनांक 13 एप्रिल, 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता त्यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या अदालतीत टपाल वस्तु, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, मनीऑर्डर, बचत बॅंक खाते प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत ‘अधिक्षक डाकघर कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव 425001 यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह दिनांक 10 एप्रिल, 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल, परंतु त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही. असेही अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!