क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती निमित्त सायकल वाटप.
प्रतिनिधी – एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूल व मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत शाळेतील ३० गरजू विद्यार्थ्यीनींना क्रातिसुर्य महात्मा फुले जयंती निमित्त सायकल वाटप करण्यात आल्या .सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन होते.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी विनय गोसावी, सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन,शालेय समितीचे चेअरमन अरुण माळी,,राजेंद्र महाजन,रमेश महाजन,आय.जी.माळी सर,जयराम माळी,सुदर्शन महाजन,पी.जी.चौधरी,शालिग्राम गायकवाड, प्रा.शिवाजीराव अहिरराव,अशोक चौधरी,संजय महाजन,मनोहर महाजन,दुर्गादास महाजन,घनश्याम माळी,मोहन चव्हाण ,मंगलाताई महाजन,लिलाताई महाजन विद्यार्थीनी व पालक उपस्थित होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विनोद जाधव यांनी तर सुत्रसंचलन दिनेश चव्हाण यांनी केले.आभार एस.पी.माळी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.