जमिनीच्या वादातुन गोळीबार
अकोला – जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येत असलेल्या लोतखेड गावात वैयक्तिक वादातुन गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात तंटामुक्त समितीचा अध्यक्ष फिरोज खान जागीच ठार झाला असून गोळीबार करणारा माजी सैनिक असल्याची माहिती समोर येत आहे.जमिनीच्या वादातुन घडलेल्या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहिहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अंमलदारांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अकोट तालुक्यातील लोतखेड येथे जमिनीच्या वादातून तंटामुक्ती समिती अध्यक्ष फिरोज खान व गावातील माजी सैनिक यांच्यात सुरुवातीला हाणामारी झाली. हाणामारीचे रूपांतर थेट गोळी झाडण्यापर्यंत गेले. फिरोज खानवर समोरच्या व्यक्तीने थेट गोळी झाडली. त्यात फिरोज खान गंभीर जखमी झाले. उपचारासाठी फिरोजला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.