अंडा फ्राय दिलं नाही म्हणून दिली भयंकर शिक्षा…
बीड: पती-पत्नीमधील वाद काही नवे नाहीत. प्रत्येक नवरा-बायकोत भांडणं होतात. अगदी जेवणही या भांडणाचं कारण ठरतं. कधी मीठ जास्त झालं, तर कधी तिखट जास्त झालं म्हणून नवरा बायकोला ओरडतो. पण एका पतीने तर हद्दच केली. त्याने बायकोने आपल्याला अंडा फ्राय दिलं नाही म्हणून तिला भयंकर शिक्षा दिली आहे. बीडमधील ही धक्कादायक घटना आहे. अंबेजोगाई शहरातील ही घटना.
पतीने आपल्या पत्नीला एग फ्राय बनवायला सांगितलं. पण तिने त्याला नकार दिला. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने धक्कादायक पाऊल उचललं. आपल्या बायकोने आपल्याला एग फ्राय खायला दिलं नाही म्हणून तो संतप्त झाला.
त्याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने तिच्या डोक्यावर काठीने वार केला. ज्यात ती जखमी झाली.
हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. एग फ्रायवरून पतीने मारहाण केल्यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्या पतीविरोधात तिने पोलिसांकडे तक्रार केली. पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केल आहे, असं वृत्त लेटस्टलीने दिलं आहे.