मुलींचा लाखांचा सौदा; सेक्स रॅकेट चालवणाऱया दोघींना अटक
ठाणे : सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडिती मुलींचे कौमार्य भंगचा लाखोंचा सौदा करून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध ठाणे गुन्हे शाखेने कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एका लॉजवर सापळा रचुन बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका पीडिती मुलींचे कौमार्य भंग करून शारीरिक संबंधासाठी दीड लाखांची मागणी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन अल्पवीयन पीडित मुलींची दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. अंजु सिसोदिया (वय ३५), सरिता सिसोदिया ( वय ३५) असे अटक महिला दलालांची नावे असून त्या नवी मुंबईतील कोपरखौरणे भागात राहणाऱ्या आहेत.
सेक्स रॅकेट उघड : पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण रेल्वे स्थानकासमोरील अनिल पॅलेस लाँजिंग आहे. पिडीत असहाय्य मुलींना फुस लावुन वेश्यागमनासाठी तयार करुन या लॉजवर मुलींचे कौमार्य भंग करणारे सेक्स रॅकेट महिला दलाल चालवीत होत्या. अशी खबर ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागाला मिळाली होती. विशेष म्हणजे महिला दलाल ह्या मावस बहिणी असून यातील आरोपी अंजु ही लॉज असलेल्या इमारतीमधील एका लेडीज बारमध्ये वेटर म्हणून कार्यरत आहे. तिला लेडीज बारमधून ग्राहक मिळत होते. त्यातच अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाने या मुलींचे कौमार्य भंग करणारे सेक्स रॅकेट उघड करण्यासाठी २० एप्रिल रोजी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला होता. त्यानुसार मुख्य आरोपी अंजु हिच्याशी बनावट ग्राहकाने मोबाईलद्वारे संपर्क करून मुलींचे कौमार्य भंग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी आरोपी दलाल महिलेने एका पीडित मुलीच्या शारीरिक संबंधासाठी दीड लाखाची मागणी केली होती. त्यानंतर ठरल्या प्रमाणे बनावट ग्राहक दीड लाख रुपये देण्यास तयार झाल्याने आरोपी महिला दलालानेच लॉजमधील रूम नंबर ११३ बुक करून त्या ठिकाणी दोन पीडित अल्पवयीन मुलींना ग्राहकाने मागणी केल्यानुसार आणले होते. मुलींची बालसुधार गृहात रवानगी : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वपोनिरी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील मसपोनिरी प्रिती चव्हाण, सहा. पोलीस उपनिरीक्षक , डी.जे.भोसले, डी.व्ही. चव्हाण, डी.के.वालगुडे, पोहवा, पी.ए. दिवाळे, के.बी. पाटील, मपोहवा एम. ए. खेडेकर, पी. जी. खरात, मपोशि के.डी.लादे यापथकाने आदीच सापळा रचला असता अनिल पॅलेस, लॉजिंग अँन्ड बोर्डींगच्या पहिला मजल्यावरील रूम नं. ११३, वर छापा टाकून दोन महिला दलालांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४८ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय दोन अल्पवयीन पीडित मुलींची त्यांच्या तावडीतून सुटका पोलिसांनी केली. महिला पोलीस मीनाक्षी खेडेकर यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा भादंवि कलम ३६६(अ), ३७०(अ), ३७०(२), ३७०(३), ३७२, ३४ सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४, ८, १२ व १६ सह बाल न्याय (बालकांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम सन २०१५ चे कलम ७५, ८१, ८७ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.