पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 1 मे रोजीचा जिल्हा दौरा
प्रतिनिधी जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.
पालकमंत्री श्री. पाटील यांचा सोमवार, 1 मे, 2023 रोजीचा दौरा असा :
सोमवार 1 मे, 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव, जि.जळगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 7.53 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथून पोलीस मुख्यालय, जळगावकडे प्रयाण. सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण राष्ट्रगीत व राज्यगीत, सकाळी 8.02 ते 8.12 मंत्री महोदय यांचा शुभेच्छापर संदेश, सकाळी 8.12 ते 8.30 परेड निरीक्षण व संचलन, सकाळी 8.30 ते 8.50 पारितोषिक वितरण समारंभ 1) आदर्श तलाठी पुरस्कार वाटप 2) सुधाकर सन्मान पुरस्कार वाटप 3) पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान वाटप 4) शासकीय पदावर निवड झाल्याबद्दल नियुक्ती आदेश वाटप, सकाळी 8.50 ते 8.55 स्वातंत्र्य सैनिक व नागरिक यांना शुभेच्छा देणे, सकाळी 8.55 ते 9.05 चहापान. सकाळी 9.05 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. सकाळी 10.30 वाजता उमाळा, ता. जळगाव येथील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता धरणगावकडे प्रयाण. धरणगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगावकडे प्रयाण, आगमन व राखीव.