नवरदेवाचे कपडे फाटेपर्यंत धू धू धुतला, घडलं तरी काय?
नांगल गावातील घटना हि संपूर्ण देशात हुंडाबंदीचे कठोर नियम असतानाही अनेकदा हुंड्यामुळे अजूनही अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. अलीकडेच असाच एक प्रकार समोर आला पण यात हुंडा मागितलेल्याचीच दया यावी अशी अवस्था करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, नवरदेवाने वधूपक्षाकडे हुंड्यात एक गोष्ट मागितली होती यानंतर या नवरदेवासह त्याच्या कुटुंबाची सुद्धा जोरदार धुलाई करण्यात आली. या लग्नमंडपातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून हुंडा मागणाऱ्यांना चांगलाच धडा मिळेल असं म्हणत अनेकजण हे फोटो शेअर करत आहेत. नेमकं असं या नवऱ्याने काय मागितलं होतं हे पाहूया.
मंडवार पोलिस स्टेशनचे कैलाश चंद यांनी सांगितले की, १ मे रोजी नांगल गावातील लखन मीना यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह बेजूपाडा पोलिस स्टेशन हद्दीतील झुटाहेडा येथील कैलाश मीना यांचा मुलगा विजेंद्र (२८) याच्याशी होणार होता. विजेंद्रचे कुटुंबीय सोमवारी सायंकाळी सात वाजता मिरवणूक घेऊन नांगल गावात पोहोचले. गावात वरात काढण्यात आली. रात्री नऊ वाजता सप्तपदी होणार होती आणि त्यासाठी वधूपक्षाच्या लोकांनी पूर्ण तयारी केली होती.मुलीचे वडील लखन मीना यांनी सांगितले की, रात्री नऊ वाजता सप्तपदी होण्यापूर्वी वराने मंडपात पैशांसह बोलेरोची मागणी केली आणि या दोन्ही वस्तू मिळाल्या तरच सप्तपदीसाठी उभा राहीन, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद वाढत गेला. हे प्रकरण इतके वाढले की वधूच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी वर विजेंद्र आणि त्याचा मामा पप्पुलाल मीणा यांना बेदम मारहाण केली. या मारामारीत नवरदेवाचे पार कपडे फाटेपर्यंत धुलाई करण्यात आली होती.