सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांचा सन्मान
एरंडोल:-येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था व शहरातील विविध संस्था व संघटना तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय माहेश्वरी यांचा सपत्नीक नागरिक सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अरुण माळी यांच्या हस्ते डॉक्टर माहेश्वरी यांचा गौरव करण्यात आला तसेच सौ शैलजा माहेश्वरी यांना साडी शाल श्रीफळ व बुके देऊन माजी नगरसेविका शकुंतला अहिरराव यांनी सत्कार केला
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अरुण माळी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट विलास मोरे यांनी केले आभार प्रदर्शन निंबा बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव विनायक कुलकर्णी सुरेश देशमुख गणेश पाटील वसंतराव पाटील जाधवराव जगताप पीजी चौधरी भगवान महाजन सुपडू शिंपी प्राध्यापक अहिरराव यांनी परिश्रम घेतले
यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय माहेश्वरी यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत कामाची निष्ठा प्रयत्न शिकाटी असेल तर यशाच्या शिखर गाठता येते तर असे प्रतिपादन केले यावेळी विविध शिक्षण संस्था माहेश्वरी समाज व्यापारी वर्ग वकील संघ व इतर संस्थांतर्फे डॉक्टर माहेश्वरी यांचा सत्कार करण्यात आला