धक्कादायक! मुलीचा मृतदेह मोटरसायकलवरून गावी घेऊन जाण्यास निघाले अन्.

n50061341016843726044799905bca0f929ff7275b27b38a95fb67745fa91100838fcdf772c421036335280.jpg

मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात धक्कादायक घडना घडली आहे. एका पित्याला आपल्या १३ वर्षीय मुलीचा मृतदेह मोटरसायकल दुचाकीवरून ठेवून ७० किलोमीटर गावी घेऊन जाण्यासाठी निघाले होते.परंतु, हा संपूर्ण प्रकाराची माहिती जिल्हाधिकारी वंदना वैद्य आणि सिव्हिल सर्जन डॉ. जी. एस. परिहार (Dr. G. S. Parihar) यांना मिळाली. यानंतर जिल्हाधिकारी वैद्य आणि डॉ. परिहार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडित पालाकांना मुलीचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनाची सोय केली.

केशवाहीतील कोटा गावात राहणारे लक्ष्मण सिंह यांची मुलगी माधुरी सिकलसेल या आजाराने ग्रासलेली होती. माधुरीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या पालकांना तिचा मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली होती. परंतु, रुग्णवाहिका ही १५ किलोमीटर अंतरापर्यंत मिळू शकते, असे त्यांना सांगितले. या पीडित लक्ष्मण यांचे गाव रुग्णालयापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना खासगी वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. परंतु, लक्ष्मण यांच्याकडे खासगी वाहनाला देण्याऐवढे पैसे नव्हते. यानतंर लक्ष्मण आणि त्यांच्या कुटुंबियांनी दुचाकीवरून मुलींचा मृतदेह नेहण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, मुलीचा मृतदेह दुचाकीवर ठेवल्यानंतर गावाच्या दिशने निघाले असताना. जिल्हाधिकारी आणि डॉक्टरांना कळाल्यानंतर वेळीच त्यांनी पीडित पालकांना थांबविले आणि मुलीचा मृतदेह गावी जाण्यासाठी वाहनाची सोय केली आणि आर्थिक मदत करण्यात आली.

About Author

You may have missed

error: Content is protected !!