राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त विकास नवाळे यांची दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत

IMG-20230530-WA0161.jpg

एरंडोल – शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित होण्यासाठी स्थानिक नागरिकांचा आणि त्यातही महिलांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. ही बाब विचारत घेऊन फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून बचतगटांमधील महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत शासकीय अधिकारी गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविणारे मुख्याधिकारी श्री. नवाळे यांनी बचतगटाच्या माध्यमातून फळझाडांची लागवड, त्यातून रोजगार निर्मिती तसेच घनकचरा व्यवस्थापनातून कंपोस्ट खत निर्मिती, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, ‘माझी वसुंधरा’ या अभियानाच्या माध्यमातून राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, कचरा लाखमोलाचा आणि शहरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार, दि. 31 मे, 2023 आणि गुरुवार, दि. 1 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत ज्येष्ठ निवेदक सुषमा जाधव यांनी घेतली आहे.

बचतगटांच्या महिलांना आत्मनिर्भरतेसह शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार

*मुख्याधिकारी विकास नवाळे *

About Author

You may have missed

error: Content is protected !!