एरंडोल पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी….!
“फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या”
प्रतिनिधी – दि. ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी धारागीर बीट हद्दीतील खडकेसीम शेत शिवारातील शेतात तूर पिकाचे शेतात गांजा या मादक पदार्थाची लागवड करुन त्याचे संगोपन केले जात आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली वरुन सदर ठिकाणी छापा टाकून ११ एकर शेतातून ८७५ किलो ६१,२५,०००/- रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात येवुन एरंडोल पोलीस स्टेशनला गु.रनं. २०१ / २०२२ NDPS Act कलम ८ (ब), २० (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी मेरसिंग खरते, रा. मध्यप्रदेश हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होवुन तो सुमारे ८ महिन्यांपासुन पोलीसांना चकमा देवुन मध्यप्रदेश येथे वेगवेगळ्या शहरात राहुन ठिकाण बदलवीत होता. सदर आरोपीचा तो राहत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारा मार्फत तो सेंधवा येथे येणार असल्याची माहीती मिळाल्याने स.पो.नि. गणेश अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, पोलीस नाईक मिलिंद कुमावत अशांनी मागील दोन दिवसांपासुन सेंधवा येथे सापळा रचुन आरोपी मेरसिंग उर्फ मुरली खरते यास पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यास संशय आल्याने तेथुन पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने पकडण्यात येवुन अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि गणेश अहिरे हे करीत असुन सदरची कारवाई मा. पोलीस निरीक्षक सतिश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.