एरंडोल येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या.
प्रतिनिधी – एरंडोल येथील पाताळनगरी परिसरातील शिवराम गंगाराम महाले (वय ६०) या वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद एरंडोल पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या माहिती नुसार एरंडोल येथील पाताळ नगरी परिसरातील रहिवासी शिवराम गंगाराम महाले (वय ६०) या वृद्धाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवराम महाले हे घरी एकटेच राहत होते ते शेतमजुरी काम करीत होते.त्यांची पत्नी व मुलगा कामधंद्या निमित्त सुरत येथे बाहेरगावी राहतात .दुपारचे स्वयंपाक केल्यानंतर अचानक त्यांनी राहत्या घरी रुमालच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी एकत्र गर्दी केली होती.एरंडोल पोलीस स्टेशनला चेतन भाऊलाल महाले यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चौधरी हे करीत आहे.