साई गजानन संस्थान मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा
प्रतिनिधी – येथील साई गजानन मंदिरात सालाबादा प्रमाणे गुरु पूर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात यावेळी हजारो भाविक भक्तांनी श्री साई व गजानन महाराज यांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी सकाळी पाच ते आठ या वेळेत गावातील भाविक भक्तांनी मंगल स्नान श्री साई व गजानन महाराज यांना मंगल स्थान घातले त्यानंतर सकाळी आठ वाजता आरती करण्यात आली तसेच सकाळी साडेनऊ वाजता सवाद्य पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली . सदर मिरवणूक तर असंख्य भाविक सामील झाले होते यावेळी सजवलेला अश्व मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच ठीक ठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले तसेच फराळ वाटप करण्यात आला.
संध्याकाळी पाच वाजेला मंदिरात महाप्रसाद वाटप करण्यात आले . यावेळी हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. रात्री नऊ वाजेला महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई गजानन संस्थांतर्फे सर्व पदाधिकारी तथा भाविकांनी परिश्रम घेतले.
तसेच शहर तथा तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक राजकीय संस्था मध्ये गुरूंना वंदन करून त्यांच्या स्मरण करण्यात आले.