जुम्मा मस्जीद ट्रस्ट कमेटीचा एरंडोल न्यायालयातील रक्कम अफरातफर फसवणुकीचा प्रलंबित खटला फिर्यादीच्या नियुक्त खाजगी वकीलांमार्फत चालविण्यास अनुमती देण्यास सत्र न्यायालयाची अखेर मंजुरी आदेश.
प्रतिनिधी – एरंडोल येथील जुम्मा मस्जीद ट्रस्ट कमेटीचे चेअरमन अस्ताफ खान नय्युम खान पठाण यांच्या तक्रारीनुसार लाखो रुपयांच्या रक्कमेची अफरातफर व फसवणूक झाल्यामुळे शेख चिरागोद्दीन शेख हुसेन व शेख इस्माईल शेख अमीर दोन्हींच्या विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल होऊन दोषारोपपत्र दाखल झाले होते. खटल्या कामी मुळ फिर्यादीने एरंडोल कोर्टात सीआरपीसी कदम ३०२ नुसार रितसर अर्ज देऊन खटल्याचे कामकाज मोठ्या रक्कमेचा अपहार तसेच वक्फ बोर्डाचा आदेश वगैरे न्यायालया समोर परीणामकारक पुरावा व कागदपत्र दाखल करण्यासाठी जेष्ठ वकील मोहन बी शुक्ला यांना नियुक्त करून शासकीय अभियोक्त्या ऐवजी यांचे मार्फत चालविण्यासाठीस अनुमती मागीतली होती परंतु एरंडोल न्यायालयाने खटला खाजगी नियुक्त वकीलांमार्फत चालविण्याची अनुमती नाकारली होती करीता मुळ फिर्यादी अस्ताफ खान नय्युमखान यांनी सदरील आदेशास म.जिल्हा सत्र न्यायालय जळगांव यांच्याकडेस फौजदारी रिव्हीजन दाखल करून आवाहन दिलेले होते त्यानुसार आज ३० जून २०२३ रोजी अतिरीक्त सत्र न्यायाधिश जळगाव श्री बी. एस. वावरे यांनी, रिव्हीजन अर्ज मंजूर करून एरंडोल न्यायालयाचा आदेश रद्द करून एरंडोल कोर्टातील प्रबंधीत खटला संस्थेतर्फे ॲड. मोहन बी. शुक्ला यांच्या मार्फत चालविण्यास अनुमती आदेश पारीत केलेले आहे मुळ फिर्यादीतर्फे अँड मोहन श्री शुक्ला यांनी कामकाज पाहिले. तर शासकीय अभियोक्ता म्हणून अँड सुरेंद्र जी. काबरा यांनी कामकाज पाहिले.