पळासनेर येथील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले जय संघर्ष संस्थेचे कार्यकर्ते.

images-7.jpeg

प्रतिनिधी – मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमे लगत असणार्या पळासनेर येथे दि.०४ जूलै २०२३ रोजी सकाळी साडे १०.३० वाजता कंटेनेरचे ब्रेक फेल झाल्यामुळे अनेक वाहनांवर आदळल्याने वाहनांचे नुकसान होऊन १० जणांचे बळी गेले व अनेक जण जखमी देखील झाले होते.जखमी अनेक व रुग्णवाहिका एक असल्या कारणाने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असणार्या जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आमदार अमरिशभाई पटेल यांच्या संपर्क कार्यालयातील श्रीकांत भट यांचे पर्यंत गेलेले होते. त्यामुळे श्रीकांत भट यांनी तात्काळ जय संघर्ष संस्थेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदिप आप्पा माळी यांना फोन करून अपघाताची माहिती दिली.
संदिप माळी यांनी तात्काळ संस्थेचे सदस्य निलेश वाल्हे,योगेश पाटिल,हितेश कोळी,जितूभाऊ पवार,प्रेमसिंग राजपुत,सोनूसिंग राजपुत,नाना कदम यांना आपआपली वाहने घेऊन घटनास्थळी घेऊन जाऊन जखमींना तातडीने रूग्णालयात पोहच करण्याची विनंती केली.
सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरील सर्व सदस्य MH18 BC 5833 व MH 18 BR 0015 या क्रुझर गाड्या मधून जखमींना तातडीने रूग्णालयात पोहचते केले.
या अपघाता मध्ये धुळे येथील संजय अग्रवाल , सचिन अग्रवाल यांची होंडा अमेझ पूर्णता: क्षतिग्रस्त झाली होती.या बाबतची माहिती योगेश येवले यांनी दिली असता युवराज सुखदेव पाटिल यांना हिरे रूग्णालयात पाठवून सदरील गाडीतील मयत महिलेस सुनिता खंडेलवाल यांचा मृतदेह निलेश वाल्हे यांच्या क्रुझर गाडी मधून धुळ्याकडे रवाना करण्यात आला.
सदरील घटने संबंधी संदिप माळी आप्पा यांचेकडे अधिकची माहिती घेण्या करीता फोन केला असता संदिप माळी यांनी सांगीतले की जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर रा.औरंगाबाद यांच्या प्रेरणेतून अपघातग्रस्तांना तातडीची मदत करणे , रक्तदान करणे व वेळ प्रसंग पाहून रूग्णांचे नातेवाईक येई पर्यंत रूग्णांना आर्थिक मदत करणे, जेवणाचे डब्बे व कपडे पुरवणे हि कामे देखील केली जातात.
जय संघर्ष संस्थेच्या या मदत कार्यामुळे नागपुर येथील रोड मार्क फाउंडेशनच्या वतीने १० जूलै २०२३ रोजी नागपुर येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांना परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

About Author

You may have missed

error: Content is protected !!