भूमिपुत्र मंत्री अनिल पाटील यांचे अमळनेर येथे जोरदार स्वागत ..

IMG-20230708-WA0022.jpg

प्रतिनिधी अमळनेर : कॅबिनेट मंत्रिपद मिळल्यानन्तर प्रथमच मातृभूमीत पाय ठेवल्यानन्तर अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र नामदार अनिल पाटील यांनी तालुक्यातील लोणे येथे शासकीय ताफ्यातून खाली उतरून भूमीवर डोके टेकवून नतमस्तक झाले.
७ रोजी सकाळी रेल्वेने जळगाव येथे आगमन झाल्यानन्तर अजिंठा विश्रामगृहात थोडा वेळ थांबले. त्यांनतर शासकीय ताफ्यासह अमळनेर कडे रवाना झाले. जळगाव ,धरणगाव येथे स्वागत झाल्यानन्तर अनिल पाटील अमळनेर तालुक्याच्या हद्दीत पोहचताच गाडीतून खाली उतरले. यावेळी ते भावनिक झाले होते. अमळनेर तालुका मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , उपाध्यक्ष संजय पाटील ,कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे , माजी नगरसेवक मुन्ना शर्मा , लोणे सरपंच भाईदास भिल यांच्यासह विविध पदाधिकाऱयांनी स्वागत केले. त्यांनतर टाकरखेडा येथे स्वागत नंतर सती मातेचे दर्शन घेतले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!