उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठकीत विविध विभागातील आढावा घेऊन संपन्न
एरंडोल – येथील पंचायत समिती सभागृहात उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विविध विभागातील आढावा घेण्यात आला.उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यक्षेत्रातील तहसीलदार सुचिता चव्हाण, पारोळा तहसीलदार देवरे, धरणगाव तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सदस्य, समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी जाधव यांचेसह विविध विभागातील अधिकारी तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील आणि पारोळा, धरणगाव गटविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बैठकीत अनुसूचित जाती- जमाती यांच्या योजनांची त्वरित उपाययोजना करण्यातसाठी ठराव मंजूर करण्यात आला. 1) एरंडोल शहरातील मातोश्री नगर, पद्मालय नगर आदींस कॉलनी परिसर भागात रस्त्यांवर नपाने पाईपलाईन खोदकाम केलेले असून सद्यस्थितीत पावसाळा सुरू असताना देखील सदरचे खोदकाम करण्यात आले. मात्र पावसाच्या पाण्यामुळे पूर्णत चिखल झालेला असून समस्या तात्काळ सोडविणे आवश्यक आहे. 2) शैक्षणिक संस्थांमध्ये अनुशेष त्वरित भरती प्रक्रिया सुरू करावी. 3) राष्ट्रीयकृत बँकेतील केंद्र व राज्य सरकारच्या योजना ची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. 4) भूमिहीन मजुरांना शासनाच्या अटी शर्तीवर भाडेपट्ट्यांनी शासकीय जमिनीचे वाटप करण्यात यावे.5) अनुसूचित जाती व जमाती वस्तींमध्ये इस्टिमेटनुसार विकास कामे करण्यात यावेत. दलित वस्तीच्या निधी दलित वस्तीमध्येच खर्च करण्यात यावा. 6) मागासवर्गीय यांच्यासाठी ग्रामनिधीतून दरवर्षी 15% निधी खर्च करण्यात यावा. वरील उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागास आदेश करण्यात आले. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करत अधिकारी, समितीचे सदस्यांना शासनाकीय योजनांची माहिती दिली. यावेळी गायकवाड आणि उपस्थित अधिकारींचा सत्कार करण्यात आला. तहसीलदार चव्हाण यांनी मतदार नोंदणी मोहीम विषयी मार्गदर्शन केले. पं.स. चे गटविकास अधिकारी जाधव यांनी रमाई घरकुल आणि शबरी घरकुल योजनेची माहिती दिली. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करा असे बैठकीदरम्यान आवाहन करण्यात आले. यावेळी समिती सदस्य देवानंद बेहेरे, प्रवीण बाविस्कर, सुनिल खोकरे, धरणगाव तालुक्यातील सदस्य मुकुंद नन्नवरे, पारोळा तालुक्यातील सदस्य राजेंद्र जावरे यांनी आपल्या तालुक्यातील समस्या सविस्तर मांडल्या. उपाय योजना करण्यासाठी तातडीने आदेश करावेत असे बैठकीत संबंधित अधिकारी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली.