एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय महाजन यांची बिनविरोध निवड.
प्रतिनिधी एरंडोल -येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय पंढरीनाथ महाजन यांची तर उपाध्यक्षपदी निर्मला देवीदास महाजन यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत सर्वांमध्ये एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासदांनी विजय महाजन यांच्या नावाला पसंती दिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी सर्व सदस्य व विविध राजकीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडकामी अनुजा आर. बाविस्कर,अजित पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.