सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण….

IMG-20230801-WA0070.jpg

एरंडोल:-येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिक सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड शालिग्राम गायकवाड माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी आनंदा चौधरी , यांची उपस्थिती होती
प्रारंभी सरस्वती प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हास्ते करण्यात आले या दिवशी या सभासदांचा वाढदिवस होता त्यांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अरुण माळी यांनी केले सूत्रसंचालन सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले. रघुनाथ कोठावदे प्रवीण महाजन , प्राध्यापक अहिरराव यांची समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप संचालक गणेश पाटील वसंतराव पाटील विश्वनाथ पाटील भगवान महाजन पीजी चौधरी सुरेश देशमुख सुपडू शिंपी जगन महाजन निंबा बडगुजर यांनी परिश्रम घेतले
आमदार चिमणराव पाटील यांनी जेष्ठ नागरिक संघटनेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची आश्वासन दिले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!